वेग मर्यादेचे उल्लंघन | १०० वाहनांवर कारवाई

Edited by:
Published on: January 28, 2024 14:42 PM
views 257  views

सिंधुदुर्ग : रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या अधिनस्त असणारे  वायुवेग पथकामार्फत विहित वेगा पेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या वर वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल १०० वाहनांवर कारवाई करण्यात आली.

या कारवाई मध्ये मोटर वाहन निरीक्षक अतुल चव्हाण, सचिन पोलादे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमित पाटील, सिद्धार्थ ओवाळ व पराग मातोंडकर सहभागी होते.