SPK त 'केमोत्सव 2024' चं शानदार उद्घाटन...!

Edited by: विनायक गावस
Published on: February 16, 2024 11:18 AM
views 70  views

सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत केमोत्सव 2024 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले  यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आणि मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखमराजे भोंसले, तसेच नियमक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत , प्रा. एम ए ठाकूर ,मदर क्वीन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ अनुजा साळगावकर, एम एसस्सी समन्वयक प्रा. डी डी गोडकर ,रसायनशास्त्र विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख डॉ डी बी शिंदे रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक वर्ग , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 केमोत्सव  2024 या निमित्ताने पदवी तर पदव्युत्तर  रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्रातील उपयोगी संकल्पनांचे पोस्टरप्रदर्शित केले.सकाळी 8 ते 11 या वेळेत शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर रसायनशास्त्रसंबंधित विविध जादुई प्रयोगाचे सादरीकरण केले. तसेच खजिन्याच्या शोधात या संकल्पनेतून विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना श्रीमंत सौ शुभदादेवी भोंसले (राणीसाहेब) आणि श्रीमंत युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिसे   देण्यात आली. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये इयत्ता सातवीचे विद्यार्थी काशीराम नाईक, गिरीश मांजरेकर, आर्यन नाईक, देवेन रसाळ हे विजेते ठरले. त्याचबरोबर 11 वीचे  प्रांजल भूषणवार, उर्मी कामत, गिरीधर गावडे, संकेत देसाई, समीरा खातीब, अमृता कुंभार, मिताली खोबरेकर, नाझीस काझी  हे विजेते ठरले. पोस्टर प्रदर्शनाच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. रसायनशास्त्राचा उपयोग पर्यावरणाच्या रक्षणासाठी केला जावा तसेच रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करिअरच्या विविध संधी मिळवण्यासाठी करावा असे प्रतिपादन युवराज लखमराजे भोंसलेे यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना रसायनशास्त्र विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख प्रा. डॉ. डी बी शिंदेे यांनी केले. तसेच रसायनशास्त्रातील करिअरच्या संधीचा त्यांनी आढावा घेतला .

प्राचार्य डॉ. डी एल भारमल व पीजी समन्वयक प्रा. डीडी गोडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तप्रसाद मळीक व प्रा. दर्शना मोर्ये यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन प्रा. डॉ. यूसी पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी  रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ.ए पी निकुम, प्रा. डॉ. वाय ए.पवार, प्रा. पी एम धुरी, प्रा. एस एस काळे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रसायनशास्त्र पदव्युत्तर पदवी विभागाचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेष प्रयत्न केले.