परशुरामभाऊ महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर

Edited by: विनायक गावस
Published on: November 02, 2023 18:44 PM
views 175  views

सिंधुदुर्ग : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व शिक्षण प्रसारक मंडळाचे  सर परशुरामभाऊ महाविद्यालय (स्वायत्त), पुणे ३० राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने 'मेरी माटी मेरा देश' पाण्याचे पुनर्वसन, जीवनाचे संवर्धन या संकल्पनेवर आधारित विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचे आयोजन केले गेले आहे. सदर शिबिर 31 ऑक्टोबर ते 07 नोहेंबर 2023 दरम्यान मु. पो. हरगुडे, तालुका, पुरंदर, जिल्हा पुणे येथे पार पडणार आहे.

या शिबिरात स प. महाविद्यालय रा से यो विभागाचे एकूण २०० स्वयंसेवक सहभागी होणार आहेत अशी माहिती रा.से. यो. विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. भगत गायवळ यांनी दिली.

सदर शिबिराचा मूळ हेतू हा रा. से. यो गीताचे बोल असणारे "गाव और शहर के दूरियों को पाटने चले' या वाक्याला धरून चालणारा आहे. या शिबिराद्वारे गावला स्वयंसेवकांद्वारे श्रमदान करून गावांसोबतच स्वयंसेवकांचाही सर्वागीण विकास साधणे हे ध्येय रा.से.यो. विभागाने समोर ठेवले आहे. तसेच शिबिरात विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. त्यात खास प्रसिद्ध व्यक्तींची व्याख्याने गाव व स्वयंसेवकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन अशाप्रकारे रा.से. यो च्या ब्रीदवाक्याला समोर ठेवत "NOT ME, BUT YOU' हे कार्य प्रत्यक्षात घडवून आणण्यात रा.से.यो. विभाग सध्या कार्यरत आहे.