LIVE UPDATES

अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी विशेष पथक

मुख्याधिकारी गौरी पाटील यांची माहिती
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 03, 2026 15:09 PM
views 105  views

  • नगर रचनाकार अक्षता रोळे यांच्याकडे पथकाची जबाबदारी

कणकवली : कणकवली नगरपंचायतीकडून शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी विशेष अतिक्रमण हटाव पथक गठीत करण्यात आले आहे. नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी याबाबत आदेश जारी केले असून नगर रचनाकार अक्षता रोळे यांची पथकाच्या पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


या पथकात सहाय्यक म्हणून एकूण १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे, फुटपाथवरील अनधिकृत व्यावसायिक स्टॉल, तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची जबाबदारी या पथकावर सोपविण्यात आली आहे. शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी ही मोहीम गांभीर्याने हाती घेतल्याचे मानले जात आहे. त्यामुळे‌ संभाव्य कारवाईकडे शहरवासीयांचे तसेच अतिक्रमणधारकांचे लक्ष लागून राहिले आहे.