शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम | 'लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण' परिसंवादाचे आयोजन

मुख्य निवडणूक अधिकारी यांची उपस्थिती | जिल्ह्यातील 800 विद्यार्थ्यांचा सहभाग
Edited by:
Published on: August 30, 2023 15:15 PM
views 151  views

सिंधुदुर्गनगरी : शिक्षक  दिनाचे  औचित्‍य साधून ५  सष्‍टेंबर  २०२३ रोजी  "लोकशाही  जीवनप्रणाली  आणि शिक्षण" या  विषयावर भोंसले  नॉलेज सिटी  चराठे,  ता.  सावंतवाडी  येथे   मुख्‍य  निवडणूक  अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत   सकाळी ११ वाजता परिसंवादाचे  आयोजन  करण्‍यात  आले आहे. या परिसंवादामध्ये भाषा अभ्यासक डॉ. प्रकाश परब, अभिनेत्री संपदा जोगळेकर, मनोविकारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर, सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, छायाचित्रकार इंद्रजीत खांबे, तसेच संवादक डॉ. दीपक पवार सहभागी होणार  आहेत. 

मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र शासन, भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त या परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिसंवादामध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील 800 विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये भोसले  पॉलिटेक्‍नीक,  चराठे,  ता.  सावंतवाडी ४००, बी. एस. बांदेकर, फाईन आर्ट  कॉलेज,  सावंतवाडी 50, श्री  पंचम  खेमराज  लॉ  कॉलेज  सावंतवाडी 100, व्हिक्‍टर  डान्‍टस लॉ  कॉलेज  कुडाळ 50, भाई साहेब सावंत आयुर्वेदिक  महाविद्यालय,  सावंतवाडी 100, श्री पंचम  खेमराज  महाविद्यालय,  सावंतवाडी 100 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

या कार्यक्रमाच्‍या  अनुषंगाने  पोस्‍टर्स   व  रांगोळी  स्‍पर्धा  आयोजित  करण्‍यात  आलेल्‍या  आहेत. ही स्पर्धा युवा  वर्ग  आणि  मताधिकार,  मताधिकार  लोकशाहीचा  स्‍तंभ , एका मताचे  सामर्थ्‍य , सक्षम  लोकशहीतील मतदाराची  भूमिका / जबाबदारी , लोकशाहीतील  सर्वसमावेषकता  आणि  मताधिकार या विषयांवर घेतली जाणार आहे. तसेच भित्तिपत्रक सादरीकरण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व पथनाट्य सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे.  नव  मतदारांना  त्‍यांचे  नांव  मतदार  यादीत  समाविष्‍ट  करता  यावे  यासाठी   भोसले  नॉलेज  सिटी  परिसरात  एस  स्‍टॉल  उभारण्‍यात  येणार  आहे.  त्‍यामध्‍ये   सर्व प्रकारचे  फॉर्म्‍स  उपलब्‍ध  करुन  दिले जातील. वरील  कार्यक्रमाचे  Web Streaming (Youtube Live,  Facebook Live)  व्‍दारे  करण्‍यात  येणार  असून सर्व  मतदार  सदर  कार्यक्रम   ऑनलाईन  DEO Sindhudurg   या  लिंकवर  पाहू  शकणार  आहेत.  तरी  सर्व  नागरीकांनी ह्या परिसवांदाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.