
बेळगाव : उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यातील सर्वात मोठा टेक्सटाइल मॉल असलेल्या BSC टेक्स्टाईल्सने पावसाळा आणि श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी खास ऑफर दिली आहे. चार मजल्यांवर एक लाख चौरस फूट पसरलेल्या या मॉलमध्ये सर्व कपडे, साड्या, रेडिमेड, सुटिंग्स इत्यादींवर महिनाभरासाठी दुप्पट सवलत दिली जात आहे.
प्रसारमाध्यमांना माहिती देताना मॉलचे व्यवस्थापकीय संचालक बी यू चंद्रशेखर म्हणाले की बीएससी टेक्सटाइलची स्थापना 1928 मध्ये दावणगेरे येथे झाली आणि तेव्हापासून ते ग्राहकांना अत्यंत वाजवी दरात दर्जेदार फॅब्रिक्स आणि इतर वस्त्र प्रावरणे देत आहे. दक्षिण महाराष्ट्र, गोवा आणि कोकणातील ग्राहकांच्या सोयीसाठी आम्ही 2022 मध्ये बेळगावी येथे शोरूमची स्थापना केली आणि तेव्हापासून ग्राहकांनी आम्हाला पसंती दिली आहे.
दरवर्षीप्रमाणेच पावसाळ्यात आणि श्रावणाच्या पार्श्वभूमीवर आमच्याकडे दुप्पट सूट आहे. आम्ही आधीच सर्व कपड्यांवर 10% सूट देत आहोत. 21 जुलै पासून एका महिन्यासाठी, आम्ही 10% च्या नियमित सूट व्यतिरिक्त अतिरिक्त 10% देऊ. शिवाय हंगामासाठी आलेल्या नविन कोऱ्या साहित्यावर ही सवलत आहे. गोवा आणि सिंधुदुर्गातील लोकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन करत चंद्रशेखर म्हणाले.
मार्केटिंग मॅनेजर अमजद जमादार म्हणाले की, बीएससी टेक्सटाइल्समध्ये कपड्यांच्या सर्व प्रकारांवर सर्वाधिक वाजवी दर आहेत.