जागतिक डायबेटीस दिनानिमित्त 'माधवबाग'ची खास ऑफर !

मधुमेहाची 1050 रुपयांची चाचणी फक्त 299 रुपयात !
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 09, 2022 19:53 PM
views 208  views

सिंधुदुर्ग : डायबिटीस म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो, मात्र अनेक रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या माधवबागने कोकणातील रुग्णांसाठी एक खास अभियान सुरू केले आहे. त्या अंतर्गत अत्यंत कमी खर्चात मधुमेहाच्या चाचण्या करण्यात येणार असून जागतिक डायबिटीस दिनानिमित्त माधवबाग खास सवलत जाहीर केली आहे.


साधारणत: डायबेटिसमध्ये सकाळी उपाशीपोटी ( fasting) आणि जेवणानंतर दोन तासांनी ( post prandial ) रक्तातील साखरेची पातळी तपासली जाते. पण हे दोन्ही रिपोर्ट त्यावेळी घेतलेले जेवण, केलेला व्यायाम आणि आदल्या दिवशीची झोप यावर अवलंबून असल्यामुळे सतत बदलत असतात.  यापेक्षा जास्त विश्वासार्ह तपासणी म्हणजेच मधुमेहाची गोल्ड स्टँडर्ड तपासणी 66 एच. बी. ए. वन सी " ( HbA1c) होय. या तपासणीत रक्तातील  हिमोग्लोबिनला चिकटलेली साखर मोजली जाते. त्यामुळे आपल्याला मागील नव्वद दिवसांमध्ये शरीरात असलेल्या सरासरी साखरेचे अनुमान काढता येते.


डायबेटिस दिनानिमित्त माधवबागने एचडी ए वन सी व ईसीजी तपासणी फक्त 299 रुपयात करण्याची सवलत दिली आहे. दिनांक 14 नोव्हेंबर या दिवशी सकाळी सात ते 11 : 30 या वेळेत ही तपासणी करण्यात येईल. या तपासणीवर येणारा खर्च 1050 रुपये इतका आहे, मात्र तो सवलतीच्या दरात 299 रुपये इतका आकारण्यात येईल. या तपासणीसाठी नोंदणी आवश्यक आहे. इच्छुक रुग्णांनी पुढील क्रमांकावर आपल्या नजीकच्या शहरात माधवबागमध्ये तपासणी करावी आणि पुढील मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी मोबाईल : कणकवली 9373183888, कुडाळ 9011328581, सावंतवाडी 7774028185.