
सिंधुदुर्गनगरी : वेंर्गुर्ला म्हापण येथील श्रीम सुजाता बाळकृष्ण गोसावी यांना बचतगटाच्या माद्यमातुन जल जीवन मिशन अंतर्गत विशेष कार्य केल्याबद्दल जल शक्ती मंत्रालय नवी दिल्ली यांच्या माध्यमातुन नवी दिल्ली येथे आयोजित दिनांक 23 ते 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिना सोहळ्याकरीता विशेष निमत्रित करण्यात आले आहे. अशी माहिती विशाल तनपुरे, प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन तथा जिल्हा समन्वयक, स्वभामि (ग्रा) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.
श्रीम सुजाता बाळकृष्ण गोसावी, म्हापण, ता. वेंगुर्ला यानी आपल्या बचत गटाच्या माध्यमातुन जल जीवन मिशन अंतर्गत गावातील नळपाणी योजना चालविण्यास घेतली आहे. या योजनेचे पाणी सोडणे, पाईप लाईन दुरुस्ती, नळ जोडनी, पाणीपट्टी वसुली आदि कामे त्या बचत गटाच्या माध्यमातुन करतात. यामुळे बचतगटाला आर्थिक फायदा झाला आहे. याची दखल घेत वेंर्गुर्ला म्हापण येथील श्रीम सुजाता बाळकृष्ण गोसावी व त्याचे पती बाळकृष्ण सिताराम गोसावी यांना दिनांक 23 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित प्रजासत्ताक दिना सोहळ्याकरीता विशेष निमत्रित करण्यात आले आहे. अशी माहीती श्री. विशाल तनपुरे, प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन तथा जिल्हा समन्वयक, स्वभामि (ग्रा) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.