डेगवे ग्रामस्थांकडून राजन तेलींचा खास सन्मान

Edited by:
Published on: October 15, 2024 07:08 AM
views 227  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील डेगवे येथील ४८ गावांचा अधिपती महालक्ष्मी स्थापेश्वर मंदीर या ठिकाणी अन्नछत्र इमारत, स्वच्छतागृह आणि मंदिर परिसराचे सुशोभिकरण करणे या कामाचे भूमिपूजन सोहळा माजी आमदार राजनजी तेली  यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी दिलेला शब्द पाळला आणि अत्यंत कमी वेळात आपल्या ओळखीचा चांगला वापर करून या ४८ गावांच्या देवस्थानातील प्रादेशिक पर्यटन मधून ३ कोटी रूपये मंजुर करून घेतले यासाठी ४८ गावचे मानकरी ग्रामस्थ यांनी राजनजी तेली यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार व सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजनजी तेली यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, प्रमोद कामत, दादू कविटकर, प्रेमानंद देसाई, अभिलांष देसाई, सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, सीताराम देसाई, मधुकर देसाई, भगवान् देसाई,  राजन देसाई, प्रविण देसाई, विलास गवस, प्रेमानंद गवस, सतिश गवस, रमेश परब, चंद्रशेखर देसाई, मंगेश देसाई,  नवनित देसाई, शरद सावंत, सुभाष देसाई, सुर्याजी देसाई,  मंगेश देसाई आदी मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.