परुळे बाजार ग्रामसेवक शरद शिंदे यांचा विशेष सन्मान..!

गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील उल्लेखनीय कामगिरी
Edited by: दिपेश परब
Published on: February 28, 2024 12:46 PM
views 93  views

वेंगुर्ले : सन २०१९ ते २०२२ या  कालावधीत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळेबाजार या गावात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ग्रामसेवक शरद शिंदे यांचा विशेष सन्मान दिनांक ५ मार्च २०२४ रोजी नाशिक येथे होणार आहे. हा कार्यक्रम पाणीपुरवठा मंत्री आणि स्वच्छता, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

परुळे बाजार गावात ग्रामसेवक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर मेहनत, दूरदृष्टी आणि गुणवत्ता यांच्या जोरावर अनेक विविध उपक्रम त्यांनी प्रभावीपणे राबवले आहेत. घनकचरा व्यवस्थापन, गांडुळखत युनिट प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन  प्रकल्प व शुद्धीकरण, प्लास्टिक बंदी, सोलर ऊर्जा वापर, अस्मिता कक्ष  काथ्या उद्योग व विविध वस्तु बनविणे, कापडी पिशव्या वापरा साठी एटीएम मशीन, तालुकास्तरीय प्लास्टिक संकलन युनीट असे नावीन्यपूर्ण आणि पर्यावरण पूरक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या माध्यमातून गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परूळेबाजार एकमेव ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक येण्याचा मान मिळवला आहे. 

भोगवे येथे  ग्रामसेवक म्हणुन काम करत असतानाही त्यांनी  विविध प्रकारच्या  उपक्रम  राबविले यात ब्लू फ्लॅग हा  महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता त्यांच्या या कामाची दखल घेऊन राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळ्यात विशेष सन्मान केला जाणार आहे.