
रोहा : तरुणांनो नोकरीच्या मागे न लागता व्यवसायिक बना असे नमूद करणारे व्यावसायिकांसाठीचे वर्कशॉप महाराष्ट्र बिझनेस क्लब व दसबा फाऊंडेशनच्या वतीने रोहा धाटाव येथिल आरआयआरसी हॉल मध्ये दोन सत्रांमध्ये घेण्यात आले, यावेळी रोहयातील २५ व्यवसायिकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या सन्मान सोहळ्यास मोठ्या संख्येने व्यावसायिक उपस्थित होते.
रायगड जिल्हा तसेच रोहा तालुक्यातील विविध व्यावसायिक क्षेत्रांत कार्यरत असलेल्या प्रगत आणि यशस्वी उद्योजकांचा विशेष सन्मान उभय संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी उपस्थित व्यवसायिकांना युवा बिझनेस पुणे "गरुड झेप स्वप्नांच्या दिशेने" यावर सुप्रसिद्ध बिझनेस कोच विजय कोटगोंड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले व तद्नंतर प्रमुख मान्यवर माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते नामांकित व्यवसायिकांना सन्मानित करण्यात आले. प्रगत शेती व्यवसाय, प्लंबिग, सुतार, कन्स्ट्र्शन, कटलरी, सायकल मार्ट, पेंटिग, खडी केशर विट भट्टी, केटरर, फार्म हाऊस, हॉटेल व्यवसायिक, वॉटर हार्वेस्टिंग, आशा विविध क्षेत्रात अग्रेसर असलेले व्यवसायिक यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमात या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला. त्यामध्ये अर्जुन गोरीवले, नरेंद्र जाधव, मंगेश भोईर, जितेंद्र गिजे, गीतराज म्हस्के, धर्मराज माने, अशोक कोतवाल, सुमित गोपिलकर, रामचंद्र नाकती, सखाराम बर्जे, अनंत मगर, नितीन बामुगडे, नारायण भोसले, नारायण कान्हेकर, नामदेव म्हसकर, राजेश कदम, निवास पवार, अभिषेक गोतावडे, अक्षता शिंदे, रुचिका जैन, विजय जाधव, मनीष खिरीट, गणेश भोकटे, पराग मोरे, आदींसह पंचविसहून अधिक व्यवसायिकांना यावेळी सन्मानीत करण्यात आले. माजी आमदार अनिकेत तटकरे, पी पी बारदेस्कर यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमास विजयराव मोरे, शंकर भगत, सुरेश मगर, रामचंद्र सकपाळ, अनिल भगत, मिलिंद आष्टीवकर, अमित घाग, सुहास खरीवले, रविंद्र मरवडे सह महाराष्ट्र बिझनेस कोच विजय कोटगोंड, मुख्य समन्वयक योगेश कडवेकर आदी मान्यवर आणि व्यवसायिक बहुसंख्येने उपस्थित होते. दसबा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश बामुगडे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन सतीश भगत यांनी केले. कार्यक्रमासाठी दसबा फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकऱ्यांनी परिश्रम घेतले.