लवकरच रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये शिंदे गटाला मोठ भगदाड पडेल : खा. विनायक राऊत

Edited by: भरत केसरकर
Published on: September 29, 2023 18:23 PM
views 2484  views

सिंधुदुर्ग : किरण सामंत यांच्यासारखे अनेकजण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येण्यासाठी सज्ज आहेत. लवकरच रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये शिंदे गटाला मोठ भगदाड पडेल. असा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी किरण सामंत यांच्या स्टेटसवर बोलताना केला आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांनी आज मशाल चिन्ह आपल्या स्टेटसला लावलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना विनायक राऊत म्हणाले लवकरच भाजप शिंदे गटाच विसर्जन करेल आणि याचीच कुठेतरी चाहुल किरण सामंत यांना लागल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असावा. लवकरच आपल्याला आणखी मोठे धक्के पाहायला मिळतील. असा गौप्यस्फोट  खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ते तळगाव येथील आपल्या निवासस्थानी बोलत होते.