
सावंतवाडी : सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा '. वैष्णवी महिमा' हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.