सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सोनुर्ली हायस्कूल अव्वल !

'होम सिक्युरिटी अलार्म' ठरले प्रथम उपकरण
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 10, 2023 19:02 PM
views 367  views

सावंतवाडी : मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सोनुर्ली हायस्कूलचा विद्यार्थी कृष्णा विष्णू नाईक याने तयार केलेल्या 'होम सिक्युरिटी अलार्म' या उपकरणाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून कृष्णा विष्णू नाईक व जिग्नेश आना गावकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा  प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित उपशिक्षणाधिकारी शेर्लेकर, मिलाग्रीसचे प्राचार्य रिचर्ड सालढाना, उपप्राचार्या सिस्टर मेबल कार्व्हालो, पर्यवेक्षिका मेघना राऊळ, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, सर्व केंद्रांचे केंद्रप्रमुख व मार्गदर्शक शिक्षक पी. जी. काकतकर आदि उपस्थित होते.