
दोडामार्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निकालात न्यू इंग्लिश स्कुल भेडशी कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेची सोनिया अर्जुन गवस ८५. ८३ टक्के मिळवून प्रथम द्वितीय ऐश्वर्या सगुण नाईक ७६. ५० टक्के, तन्मय रमेश लोंढे ७२. ५० टक्के गुण मिळवीत कॉलेजमध्ये तृतीय क्रमांक मिळविला.
न्यू इंग्लिश स्कूल भेडशी कॉलेजचे एकूण ४१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी एकूण ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात वाणिज्य शाखेत प्रथम सोनिया अर्जुन गवस ८५. ८३ टक्के, द्वितीय ऐश्वऱ्या सगुण गवस ७६. ५० टक्के तर तृतीय तन्मय रमेश लोंढे ७२. ५० टक्के तर कला शाखेमध्ये आकांशा काशिनाथ च्यारी ५४. ८३ टक्के द्वितीय सिया चंद्रकांत नाईक ५२. १७ टक्के तर तृतीय रोशन सखाराम देसाई ५१. ५० टक्के मिळवून उत्तीर्ण झाले या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रशालेकडून तसेच तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.










