
विज्ञान शाखेची 100 टक्के निकालाची परंपरा कायम
सावंतवाडी : उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सावंतवाडी येथील आर.पी.डी. ज्युनियर कॉलेजने यश संपादन केले आहे. कॉलेजचा एकूण निकाल ९५.४६% लागला असून, विशेष म्हणजे विज्ञान शाखेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. प्रशालेतून ९५ टक्के गुणांसह दत्तराज शैलेश पै प्रथम ठरला आहे. द्वितीय हर्षदा कासार ९२.६७ टक्के द्वितीय तर तृतीय क्रमांक ९२.१७ टक्के गुणांसह विभागून निधी साटेलकर, चिन्मय असणकर, मानस कोलते यांनी प्राप्त केला आहे.
कॉलेजमधून एकूण ६८३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत एकूण २७७ विद्यार्थी बसले होते. सर्वच्या सर्व २७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १००% निकाल लागला.वाणिज्य ९२.९३% व कला शाखा निकाल ९१.२४% एवढा लागला आहे. विज्ञान शाखेत प्रथम तन्वी वामन काणेकर ९०.१७%, द्वितीय श्रेया गुणाजी गवस ९०.००%, तृतीय सोहम सचिन सावंत ८७.३३% हीने प्राप्त केला.
वाणिज्य शाखेतून प्रथम दत्तराज शैलेश पै ९५.००%, द्वितीय विभागून निधी समीर सातेलकर, चिन्मय शांताराम आसणकर, मानस समीर कोलते या तिघांनाही ९२.१७% गुणांसह तर तृतीय रिद्धी दिलीप बोभाटे ९१.८३% गुणांसह प्राप्त केला आहे.
तसेच कला शाखेतून प्रथम हर्षदा रमाकांत कासार ९२.६७%, द्वितीय सानिका संदीप ठाकूर ८२.६७%, तृतीय सृष्टी प्रवीण ठाकर ८२.००% यांनी प्राप्त केला आहे. वाणिज्य शाखेतील रिद्धी दिलीप बोभाटे आणि मानस समीर कोलते या दोन विद्यार्थ्यांनी 'बुक-कीपिंग अँड अकाउंटन्सी' या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष यश संपादन केले आहे. या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक आणि संस्था चालकांकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले जात आहे. या यशात संस्था अध्यक्ष विक्रांत सावंत (जिल्हा परिषद सदस्य, सिंधुदुर्ग), उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक , शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत व सर्व पदाधिकारी यांचे वेळोवेळी मिळालेले प्रेरणादायी मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले आहे.










