
सावंतवाडी : नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल व कला शाखेचा ९३.३३ टक्के निकाल लागला. प्रशालेतून सर्वेश होडावडेकर ७८ टक्के गुण प्राप्त करून प्रथम, द्वितीय निधी धुरी ७६.१७ टक्के तर तृतीय कनिष्क नाईक ७०.३३ टक्के गुणांसह तृतीय आला आहे.
वाणिज्य शाखेतून सर्वेश पुरुषोत्तम होडावडेकर यांने ७८ टक्के गुण प्राप्त करून प्रथम आला.द्वितीय क्रमांक-कनिष्क गणेश नाईक ७०.३३ टक्के व तृतीय क्रमांक- ऋतुजा गजानन वेंगुर्लेकर हिने ६९.५० टक्के प्राप्त केले.वाणिज्य शाखेतून एकूण १६ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ होऊन शाळेचा निकाल १०० टक्के लागला .तर कला शाखेतून प्रथम क्रमांक - निधी गुरुनाथ धुरी हिने ७६.१७ टक्के प्राप्त केले.द्वितीय क्रमांक- अनिशा चंद्रकांत मयेकर हिने ६७ टक्के प्राप्त केले .व तृतीय क्रमांक- लाडोबा सूर्यकांत चव्हाण यांने ६४.५० टक्के गुण प्राप्त केले. कला शाखेतून एकूण १४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते .१३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९३.३३ टक्के निकाल लागला. या यशप्राप्त विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचेअध्यक्ष आ.भि.राऊळ सर व संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य आर.के.राठोड , माजी प्राचार्या कल्पना बोवलेकर , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी अभिनंदन केले.










