दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९८.६६ टक्के

वासुदेव बिले, साक्षी वरक आणि प्राची कदम चमकले
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: May 02, 2026 17:10 PM
views 36  views

​कुडाळ : वेताळ - बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय (गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी, पणदूरतिठा) या महाविद्यालयाने उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या या परीक्षेचा निकाल ९८.६६ टक्के लागला असून तिन्ही शाखांमधील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे.

​या परीक्षेत महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांतून एकूण २९९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी २९५ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत.

​शाखानिहाय गुणवंत विद्यार्थी खालीलप्रमाणे:

​१. विज्ञान विभाग (Science):

​प्रथम: वासुदेव विनायक बिले (८४.६७%)

​द्वितीय:  भक्ती नागेश आईर (८३.१७%)

​तृतीय: वंदना मंगेश पवार (८२.६७%)

​२. कला विभाग (Arts):

​प्रथम: साक्षी सुरेश वरक (८७.००%)

​द्वितीय: रेणुका राजन पावसकर (७३.००%)

​तृतीय: ऐश्वर्या शिलवंत दुर्वे (७१.८३%)

​३. वाणिज्य विभाग (Commerce):

​प्रथम: प्राची प्रविण कदम (८५.१७%)

​द्वितीय: निशांत संतोष परब (८३.५०%)

​तृतीय: तन्वी संदिप शेलटे (८१.१७%)

​विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन आपासाहेब गावडे, सचिव  नागेंद्र परब, उपाध्यक्ष  प्रकाश जैतापकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक  एम. जी. कर्पे सर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. या यशात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.