
सावंतवाडी : ओप्पो मोबाईल कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट फोनवर जाहीर करण्यात आलेल्या योजनेतील मारुती कार जिंकणारे विजेते शिरोडा-परबवाडा येथील सोमनाथ नागवेकर ठरले आहेत. सावंतवाडीच्या किर्ती सेल्स मोबाईल मध्ये त्यांनी हा मोबाईल खरेदी केला होता. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ओप्पो स्मार्टफोन खरेदीवर देशातील ग्राहकांसाठी विविध बक्षिसे जाहीर करण्यात आले होते.
यात मारुती कार, टू व्हीलर , स्मार्टफोन तसेच कॅश रिवॉर्ड अशी अनेक बक्षीची जाहीर करण्यात आली होती. ही ऑफर १५ एप्रिलपर्यंत चालू राहणार आहे. दरम्यान गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर किर्ती सेल सावंतवाडी येथे खरेदी करणाऱ्या श्री.नागवेकर यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांना मारुती कार बक्षीस मिळाली असून लवकरच त्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल सावंतवाडी ब्रांचचे मालक सोहराब बेग, व्यवस्थापक थॉमसन कोचरेकर, चंदन होडावडेकर, अक्षय गावकर, राखी गावकर यांनी अभिनंदन केले.