
सावंतवाडी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सावंतवाडी मतदारसंघात ठाकरे गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपचे काही चेहरे आमच्या संपर्कात आहेत असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला. मात्र, देव सोडून देवचाराची पुजा करणार नाही अस मत त्यांनी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांना ताकद देऊन संधी देऊ असं ते म्हणाले.
लोकसभेत दीपक केसरकरांनी शिवसेनेला केलेली मदत फुकटची नव्हती. त्याच्या बदल्यात त्यांना पक्षाने खूप काही दिलय. मंत्रीपद देवून केसरकरांवर मेहरबानी केली. अजुनही काय दिलं ते सगळंच या ठिकाणी सांगता येणार नाही. उपकाराची जाण केसरकरांनी ठेवावी. दहशतवाद म्हणून ज्यांच्या विरोधात केसरकर राहिले आज त्यांनाच पाणी देण्याची वेळ केसरकरांवर आली आहे. मात्र, ते कोणासोबत प्रामाणिक राहणार नाहीत. लोकसभेसाठी केसरकरांनी शिवसेनेला मदत केली ती फुकट नव्हती. त्यांच्या बदल्यात त्यांना मंत्रीपद देत मेहरबानी केली आहे. उपकाराची परत फेड करण्यात आली आहे.
दरम्यान, सावंतवाडीतून आमदारकीसाठी पक्षातील पाचजण इच्छुक आहेत. त्यांची नावे जाहीर करणार नाही. कुणाला उमेदवारी द्यावी याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. भाजपातील लोकांचा देखिल त्यात समावेश आहे. मात्र, देव सोडून देवचाराची पुजा करणार नाही अस मत खासदार राऊतांनी व्यक्त केले.
यासह न्यायालयाचे कारण न सांगता जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांना शिक्षणसेवक किंवा शिक्षण स्वयंसेवक म्हणून भरती करून घेण्यात याव तो निर्णय तात्काळ घ्यावा अन्यथा १६ जूनला शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर सर्व बेरोजगारांना घेऊन आंदोलन करू असा इशारा विनायक राऊत यांनी दिला. तर माडखोल धरण्याच्या डाव्या उजव्या कालव्याचा प्रश्न मिटविल्याशिवाय गप्प बसणार नाही. या कालव्याच्या नावावर सरकारी अधिकारी व ठेकेदार करोडो रुपये उकळतात असा आरोप करत
यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठक रत्नागिरी येथे घेऊन माडखोल धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याचा प्रश्न मिटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं विधान खासदार राऊत यांनी केलं. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, चंद्रकांत कासार, आबा सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.