चतुर्थी पूर्वी वेंगुर्ले शहरातील समस्या सोडवा | राष्ट्रीय काँग्रेसचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Edited by: दिपेश परब
Published on: August 22, 2023 15:31 PM
views 272  views

वेंगुर्ले : गणेश चतुर्थी पूर्वी वेंगुर्ले शहरातील गणेश घाटांची स्वच्छता, डास प्रतिबंधक फवारणी, वाहतूक व्यवस्था आदी विविध समस्यांवर त्वरीत उपाययोजना नगरपरिषद मार्फत करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय कॉंग्रेस तर्फे आज निवेदनाद्वारे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची भेट घेऊन करण्यात आली. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेंगुर्ले शहरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करणे, मोकाट जनावरांचा त्वरीत बंदोबस्त करणे, शहरातील सर्व गणेश घाटांची स्वच्छता करणे, रस्त्या बाजूची झाडी तोडणे, चार कापणे, शहरातील सांडपाण्याचे निचरा करणेसाठी त्वरीत उपाययोजना करणे, बाजारपेठेतील वहातूक समस्येवर व पार्किंगबाबत व्यापारी, लोकप्रतिनिधी व नागरिक व पोलिस प्रशासन यांची एकत्रित बैठक बोलावून त्यावर सर्वमान्य तोडगा काढणे.

वरिल सर्व बाबींवर गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस च्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश डिचोलकर, माजी नगरसेवक आत्माराम सोकटे, माजी नगरसेविका कृतिका कुबल, अश्विन पांगम आदी उपस्थित होते.