पडेल येथील होतकरू मुलांना मनसेकडून सौर कंदील वाटप...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 16, 2023 12:52 PM
views 74  views

देवगड : मनसे लॉटरी सेना अध्यक्ष व व्यापारी सेना उपाध्यक्ष गणेश कदम यांच्याकडून श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पडेल मधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सोलर कंदीलचे मोफत वाटप अमितअर्जुन तानवडे व अमित काशिनाथ घाडी यांच्या मार्फत पडेल येथील श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर येथे करण्यात आले.


या प्रसंगी सौर कंदील वाटपा मागचे महत्वाचे कारण सांगताना अमित तानवडे म्हणाले ग्रामीण भागात विजेची येजा सुरु असते. त्यावेळी मुलांच्या अभ्यासावर याचा कुठेतरी परिणाम होताना दिसतो.हे महत्वाचे कारण लक्ष्यात घेऊन मुलांना सौर कंदील वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

यावेळी गणेश जगन्नाथ कदम महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना व व्यापारी सेना उपाध्यक्ष ,अमित अर्जुन तानवडे सरचिटणीस वाहतूक सेना सहसंपर्क देवगड मनसे लॉटरी विक्रेता सेना, अमित काशिनाथ घाडी तालुकाध्यक्ष देवगड मनसे लॉटरी विक्रेता सेना, ग्रा. सदस्य पडेल, प्रकाश वारिक विभाग अध्यक्ष पडेल विभाग, सिद्धेश सुरेश घाडी शाखा अध्यक्ष पडेल,श्री.दीक्षित सर माजी सरपंच पडेल,श्री.विश्वनाथ पडेलकर उपसरपंच पडेल, स्नेहा विश्वनाथ तानवडे मा. ग्रा. सदस्य, विध्यर्थी, शिक्षक, कर्मचारी आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.