केसरकरांच्या स्थानिक विकास निधीतू सौर ऊर्जा हायमास्ट

Edited by: विनायक गांवस
Published on: October 14, 2024 13:54 PM
views 274  views

सावंतवाडी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रूपयांचे सौर ऊर्जा हायमास्ट शहरात बसविण्यात आले. जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान व मिलाग्रीस हायस्कूल येथील शासकीय जागेतील हायमास्टच लोकार्पण करण्यात आले.  युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व गजानन नाटेकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. 

सावंतवाडी जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे ३ लाख ४७ हजारा रूपयांचा व मिलाग्रीस हायस्कूल समोरील शासकीय जागेत ६ लाख ८१ हजारांचा निधी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आमदार निधीतून मंजूर केला होता. या सौर ऊर्जा हायमास्टचे लोकार्पण रविवारी करण्यात आले‌. यावेळी मिलाग्रीसचे फादर मिलेट डिसोझा, शिवसेना शहरप्रमुख बाबू कूडतरकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,अनारोजीन लोबो,भारती मोरे,दिपाली सावंत,संजय पेडणेकर,सुनिल नाईक,शर्वरी धारगळकर,शिवानी पाटकर, किरण नाटेकर, दत्ता सावंत, सागर गावडे आदी उपस्थित होते.