
सावर्डे : विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शेती विषयी गोडी निर्माण व्हावी तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून मातीची सुपिकता व मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाण्यातील वेगवेगळे घटकांचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने गांधी तीर्थ जळगाव यांचे उपक्रमांतर्गत गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे येथे माती व पाणी परीक्षण प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.या प्रात्यक्षिकासाठी शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाच्या कृषि विभागाचे प्रा. डाॅ.हरिश्चंद्र भागडे हे मार्गदर्शक म्हणून लाभले.
या सर्व विषयांवर डाॅ.हरिश्चंद्र भागडे व सहाय्यक सागर सागवेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच माती व पाणी तपासणी साठी लागणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांची ओळख विद्यार्थ्यांना करुन दिल्याने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या विषयी कुतुहल निर्माण झाले. माती व पाणी परीक्षण करण्याकरिता प्रत्यक्ष लॅब मध्ये जाणे शक्य झाले नाही तरी आपण माती व पाणी परीक्षण किट द्वारे ते करू शकतो हे प्रत्याक्षिकाद्वारे दाखवून दिले.भविष्यामध्ये जे विद्यार्थ्यी शेतीकडे उपजिविकेचे साधन म्हणुन बघणार असतील त्यांनी या विषयावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे हे पटवून दिले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे दिल्या गेलेल्या या माहितीमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक शंकांचे निरसन होण्यास मदत झाली. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या मध्ये शेती विषयी गोडी निर्माण करण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल संयोजक संदीप पवार यांचे विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे उपप्राचार्य विजय चव्हाण पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी विशेष कौतुक केले आहे. पाणी व माती परीक्षणामध्ये सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक डॉ. हरिश्चंद्र भागडे