भरघोस उत्पादनासठी जमिनिचे आरोग्य महत्त्वाचे : डॉ. प्रमोद सावंत

रासायनिक अवशेष मुक्त अन्न निर्मितीसाठी करा नैसर्गिक शेती
Edited by:
Published on: February 16, 2024 14:17 PM
views 70  views

सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षानिमित्ताने श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, सरस्वती एज्युकेशन सोसायटी, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र व छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 15 ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिजामाता संकुल ओरोस येथे आनंदोत्सव कार्यक्रम साजरा होत आहे. माजी खासदार सुधीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव चालू आहे.

आज नैसर्गिक शेती, आंबा काजू मोहर संरक्षण , वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण व बांबू लगवड या विषयाच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोलीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रमोद सावंत उपस्थित होते. त्यानी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. जमिनीचे उत्तम आरोग्य व संतुलन राखण्यासाठी नैसर्गिक शेती महत्त्वाची आहे. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात यावे जेणेकरून रासायनिक अवशेष मुक्त अन्न व आरोग्य सुरक्षा देता येतील. नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होते त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होऊन निव्वळ नफा वाढतो. 

किर्लोस कृषि विज्ञान केंद्र व छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालयाच्या अनुभवातून शिका या प्रकल्पांतर्गत नैसर्गिक पध्दतीने विविध पिकांची लागवड केली आहे. तसेच नैसर्गिक निविष्ठा निर्मिती केंद्राची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी कृषि प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत उपस्थित होते. उपाध्यक्ष श्री प्रदिप सावंत यांचे हस्ते डॉ प्रमोद सावंत यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन शास्त्रज्ञ डॉ आनंद हनुमंत्ते यानी केले. शास्त्रज्ञ डॉ विजय देसाई यांनी आंबा व काजू मोहर संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. नागेश दप्तदार यानी वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण या विषयावर तर बांबू लागवड या विषयावर डॉ अजय राणे यानी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर सावंत, उपाध्यक्ष प्रदिप सावंत, आत्माच्या प्रकल्प संचालक श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमूख बाळकृष्ण गावडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, डॉ विलास सावंत, विकास धामापुरकर, डॉ केशव देसाई, विवेक सावांतभोंसले, सुमेधा तावडे, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश परुळेकर, प्राध्यापक,   शेतकरी, महिला व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.