सोनुर्ली यात्रेसाठी सोहमने अप्रतिम सजवली ST बस

Edited by:
Published on: November 28, 2023 20:01 PM
views 94  views

सावंतवाडी : दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच नवसाला पावणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवास मंगळवारी प्रारंभ झाला आहे. जत्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यसह गोवा, कर्नाटक राज्यातील भाविक सोनुर्लीत हजेरी लावत आहेत. यानिमित्ताने सावंतवाडी येथील सोहम परब या युवकाने आपल्या वाढदिवसानिमित्त सोनुर्ली यात्रेसाठी एसटी बस सजवून दिली. सोहम परब नेहमीच एसटीसाठी बोर्ड तयार करणे व इतर मदत करत असतो. यानिमित्त सोहम परब याला सर्व एसटी कर्मचाऱ्यांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देण्यात आल्या असून त्याच्या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.