मानवाधिकार संघटनेतर्फे सन्मान समाजसेवकांचा !

महाराष्ट्र सचिव अमित वेंगुर्लेकर यांच्या वाढदिवासचं निमित्त
Edited by: विनायक गांवस
Published on: April 28, 2023 20:27 PM
views 199  views

सावंतवाडी : समाजात काम करणाऱ्या मान्यवरांची दखल घेऊन मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन, भारत तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रम पार पडला. यामध्ये युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, महाराष्ट्र पोलिस प्रमोद काळसेकर, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, कोकणसाद LIVE व दै. कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन महाराष्ट्र सचिव अमित वेंगुर्लेकर यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याच आयोजन करण्यात आले आहे. अमित वेंगुर्लेकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजगाव येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले.



याप्रसंगी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन भारत तर्फे कोकणसाद LIVE व दै. कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, महाराष्ट्र पोलिस प्रमोद काळसेकर, अमित राऊळ, समाजसेवक अस्लम शेख, डॉ. गोविंद जाधव, राकेश केसरकर, रवी जाधव, संदीप चांदरकर, सुधीर आडीवरेकर, पत्रकार सुभाष चौगुले, जे.के. गोरंबेकर, रसूल शेख, कोल्हापूर, अनंत शांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था अध्यक्ष भगवान गुरव, स्वराज्य संघटना अध्यक्ष अमोल साटेलकर आदींचा सत्कार  करण्यात आला.


यावेळी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटना, भारत राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद शेख, पोलिस सेवा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत डोंगरे, तज्ञ संचालक अनिल माळवी, ह्युमन राईटस न्याय सुरक्षा संघटना सेक्रेटरी अमित वेंगुर्लेकर रिटायर्ड पीएसआय पश्चिम महाराष्ट्र, अध्यक्ष, अप्पासाहेब कोकीतकर, सदस्य सुर्यभान पाटील, ह्युमन राईटस महिला जिल्हाध्यक्षा निलिमा गवस, सिंधुदुर्ग जिल्हा प्रेसिडेंट रिझवान बाडिवाले, परवेझ बेग, उद्धव दिवटे, रहीम मुल्ला, संतोष तळवणेकर, अश्पाक शेख, संजय गावडे, अनंत सोन्सुरकर, अबिद कित्तूर, सानिया शेख, श्रृतिका दळवी, राबिया बागवान, अनिता नारकर, सिताराम केळुसकर, शैबाज शेख आदी उपस्थित होते.