
सावंतवाडी : कारीवडे गावाचे सुपुत्र आणि समाजसेवेक लक्ष्मण साईल यांचे दुःखद निधन झाले. दीर्घ आजाराने मुंबई – मीरा रोड येथील राहत्या घरी त्यांनी ६४ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
अपार मेहनत, बुद्धीमत्ता संघर्ष आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी आपले विश्व निर्माण केले. केवळ व्यवसायातच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी छाप सोडली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली गावातील अनेक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले. भैरववाडीतील कोणताही उत्सव असो वा सामाजिक कार्यक्रम, त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने काल दुपारी १ वाजता दवाखान्यात नेले जात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, मुलगा, सून, नात, मुलगी आणि जावई असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.