
कणकवली : राष्ट्रवादीचे पक्षाचे राष्ट्रीय तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्ष सामाजिक सप्ताह म्हणून साजरा करीत आहे. ज्येष्ठांचा सन्मान, वृक्षरोपण, वृक्ष रोपांचे वाटकरणे यासह अन्य समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सांगितले.
अजित पवार यांचा वाढदिवसानिमित्त अबिद नाईक यांच्या उपस्थितीत जि. प. शाळा नंबर ५ येथे वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना आल्पोहाराचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, सचिव सतीश पाताडे, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, उपाध्यक्ष किशोर गावकर, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा निशिकांत कडुलकर, कणकवली शहराध्यक्ष इम्रान शेख, हुमेरा नाईक, उपाध्यक्ष गणेश चौगुले, , वासिम फकीर, माजी तालुकाध्यक्ष राजेश पाताडे, उदय सावंत, इम्तियाज फकीर, बाळू मेस्त्री, अंकुश मेस्त्री, जहीर फकीर, मुख्याध्यापिका कल्पना मलये, उज्ज्वला जावडेकर, अंगणवाडी शिक्षिका स्वाती पोयेकर, केतकी दळवी, शिक्षका शर्मिला चव्हाण,सोनाली जाधव, विशाखा धुमाळे,सदिशा शिवगण, रसिका मिराशी, सुशील शिरसाठ, श्रीमती पाटील उपस्थित होत्या.
शाळेच्या परिसरात अबिद नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हुमेरा नाईक, कल्पना मलये, उज्ज्वला जावडेकर यांनी विद्यार्थ्यांना अल्पोहार दिला. कल्पना मलये यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी अजित पवार यांच्या दीघार्युष्य व उत्तम आरोग्यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना केली.