
सावंतवाडी : डॉ.नवांगुळ यांच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णाला ऑपरेशन दरम्यान O- निगेटिव्ह या दुर्मिळ रक्ताची गरज भासली असता सावंतवाडी रूग्णालयाचे सुरक्षारक्षक सुर्यकांत आडेलकर मदतीला धावून आले. त्यांनी सावंतवाडी व ओरोस जिल्हा रुग्णालय मध्ये रक्त उपलब्ध नसल्याने व तातडीने रक्त देण्याची प्रोसेस होत नसल्याने लाईफटाईम रुग्णालय पडवे या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करत रूग्णास जीवनदान दिले.
ओ निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता असताना युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांना डॉ नवांगुळ यांनी संपर्क साधल्यावर त्वरीत प्रतिसाद देत सुरक्षारक्षक सुर्यकांत आडेलकर मदतीला धावून आले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीसाठी युवा रक्तदाता संघटना व रक्तदात्याचे रूग्णाच्या नातेवाईकांनी आभार मानले आहेत.