
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस परेड मैदानावर 21 ऑक्टोंबर रोजी झेंडा दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहीद पोलीस स्मृति स्तंभाच्या ठिकाणी वीरगती प्राप्त झालेल्या पोलिसांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम व शिवम सावंत उपस्थित होते.
जिथे गरज वाटते अशा प्रसंगामध्ये पोलिसांना नेहमीच मदत करणारे सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते यांना या कार्यक्रमाला निमंत्रित करून "पोलीस मित्र" हा बहुमान देऊन सन्मानित करण्यात आले.
हा मान सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सावंतवाडीचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम व सामाजिक कार्यकर्ते शिवम सावंत यांना मिळाला. याप्रसंगी वीरगती प्राप्त झालेल्या पोलिसांना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व पोलीस अमित राऊळ यांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांची "पोलीस मित्र" म्हणून शिफारस केली होती. याप्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे काम खूप चांगले, कौतुकास्पद आहे. त्यांच्या जवळ मोठी मॅनपावर आहे, मी हे स्वतः अनुभवलेले आहे अशी स्तुती केली. तर पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहीकर यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना शाब्बासकी दिली.