
कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर व सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त असलदे येथील देवीच्या वृद्धाश्रमात अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तेथे केक कापून नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच कणकवली शहरातील शाळा नंबर ५ येथे शैक्षणिक साहित्य व वृक्षरोप वाटप करण्यात आले.
दोन्ही उपक्रमांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त कणकवली नगर वाचनालय येथे विविध पुस्तकांचे वाटप, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटपही करण्यात आले. तर दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नाईक यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.