
कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाटा येथील वळणावर सातत्याने अपघात होत आहेत. या ठिकाणी अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. चुकीच्या पद्धतीने केलेल्या रस्त्यांमुळे हे अपघात होत आहेत. या अपघाताची जबाबदारी कोण घेणार? याबाबत उप विभागीय अधिकारी यांना पत्र दि. 25 जानेवारी 2023 रोजी दिले होते. याबाबत कोणतेही उत्तर किंवा कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे उद्या सकाळी सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे कणकवली पोलिसांनी १४९ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई होईल, अशी नोटीस श्री.मेस्त्री यांना बजावली आहे.
बाळू मेस्त्री यांनी पोलिसांना पाठवलेल पत्र असे, कणकवली परिसरातील होणाऱ्या आपघातांबाबत व जीवितहानीबाबत मी शासन दरबारी पत्र व्यवहार केला होता. आज दि. 09/02/ 2023 पर्यंत संबंधित यंत्रणेकडून कोणताही ठोस, न्याय्य निर्णय झालेला नाही. तसेच तसे होतानाचा प्रयत्नही दिसत नाही. सबब शासन दरबारी या आपघातान बाबत जाग आणण्यासाठी दि. 10 रोजी हळवल फाटा येथे ठिय्या आंदोलनास बसणार आहे.