म्हणून नारायण राणेंना दारोदारी फिरण्याची वेळ : गौरीशंकर खोत

Edited by:
Published on: November 10, 2024 18:02 PM
views 261  views

 कुडाळ : विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार व त्यामध्ये आ. वैभव नाईक  मंत्री असतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घावनळे येथे संतोष मुंज यांच्या दुकानासमोरील पटांगणात महाविकास आघाडीचा मेळावा पार पाडला यावेळी.आ.वैभव नाईक,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते गौरीशंकर खोत, काँग्रेस उपतालुकाध्यक्ष संतोष मुंज ,काँग्रेस तालुका सचिव  पांडु खोचरे,घावनळे माजी सरपंच  दाजी धुरी, माजी उपसरपंच प्रभाकर खोचरे,शिवसेना उप तालुका प्रमुख कृष्णा धुरी,  पप्पू महाडेश्वर,सुधीर राऊळ, ग्रा.सदस्य सुनिल खोचरे,महेश पालव,सुनिल पारकर,बाबु शेळके, नंदकुमार घाडीगावकर, शेखर सांवत चंदु जाधव,उदय लाड,दाजी पालव,हनुमंत देसाई,प्रमोद खोचरे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

महाविकास आघाडीच्या  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संतोष मुंज म्हणाले आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांमुळे भात पिकाला योग्य हमीभाव मिळून  भात खरेदी सुरू झाली. शेतकर्‍यांना बोनसही  मिळून दिला. शेतकऱ्यांना आमदार वैभव नाईक यांच्यामुळे  न्याय मिळाला असे मुंज यांनी सांगून मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकास कामे त्यांनी केले त्यामुळे सर्व सामान्यांचे आपला आमदार म्हणून वैभव नाईक यांनाच पसंती आहे. नाईक यांना आम्ही निवडून आणणार असा निर्धार करुया असे संगत बेसावध राहू नका घराघरापर्यंत मशाल निशाणी  पोहोचवा असे आवाहन त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना केले आहे. 

यावेळी बोलताना गौरीशंकर खोत म्हणाले आ.वैभव नाईक यांनी मतदार संघात केलेली कोट्यावधी रूपयाची विकासकामे कामे पाहून नारायण राणे यांना धडकी भरली असून आपली घराणेशाही चालण्यासाठी माजी केंद्रीय उद्योगमंत्र्यांला दारोदार फिरण्याची वेळ आली आहे यातूनच आमदार वैभव नाईक यांचे काम बोलत आहे पुढे बोलताना ते म्हणाले की कुडाळ-मालवणच्या जनतेला नारायण राणेंची घराणेशाही नेस्तनाबूत करण्याचे आव्हान देखील त्यांनी यावेळी केली आहे.

आ. वैभव नाईक म्हणाले  आपण ५ वर्ष मतदारसंघात विकास कामे करताना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच कामे केली आहेत,महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी  आजपर्यंत जशी साथ दिली तशीच यापुढे देखील द्यावी असं सांगत राणे  कुटुंबीय निवडणुकीचे वारे बघून पक्ष बदलणारे आहेत. जे आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहू शकत नाही ते आपल्या जनतेशी काय प्रामाणिक राहणार म्हणूनच जनतेशी एकनिष्ठ न राहणाऱ्या राणे कुटुंबाला आता घरी बसवण्याची वेळ आली आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.