
कणकवली : भाजपा असेल तिथेच निधी, असे जर दबाव तंत्राचे राजकारण भाजपाने सुरू केले असेल तर जिल्ह्यातील सर्व पक्षांनी पेटून उठल पाहिजे, असं मत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी व्यक्त केल आहे. राज्यात भाजपाकडून दबाव तंत्राचे राजकारण सुरू असून भाजपाचे आमदार ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नांदगाव मध्ये भाजपाच्या विचाराचा सरपंच द्या, अन्यथा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांसह मी निधी देणार नाही, असं खेदजनक व दुर्दैवी वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी अस राजकारण ठरवलं का, याच उत्तर अगोदर त्यांनी द्यावं, अस आवाहन माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केल आहे. कणकवलीत पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते.
राज्य व केंद्र सरकारकडून थेट निधी ग्रामपंचायतीला देण्यात येतो. भाजपाच्या विचारांचा सरपंच असलेल्या जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतींचा विकास केला, असा सवाल उपरकर यांनी उपस्थित केला. भाजपची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये आजही खड्डेमय रस्ते, काही ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये स्ट्रीट लाईट नाही, दवाखान्यात डॉक्टर नाही, रेशनवर धान्य नाही, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राणेंच्या वक्तव्याचे समर्थन करताना आतापर्यंत राणे कुटुंबाचा दहशतवाद संपवण्यासाठी शिवसेनेत गेल्याचे वक्तव्य केले. परंतु केसरकर यांच खर रूप समोर आलं. दीपक केसरकर यांनी राणेंच्या वक्तव्याचे समर्थन करत असताना दहशतवाद संपल्याची भूमिका घेत आता राणेंसोबत केसरकर बंद खोलीत चर्चा करत असल्याचा आरोपही श्री उपरकर यांनी केला.
राष्ट्रवादी, त्यानंतर शिवसेना व आता पुन्हा शिंदे गट असा ढोंगीपणा केसरकर यांनी केला. आतापर्यंत राणेंच्या दहशतवादावर बोलणाऱ्या केसरकर यांनी राणेंचा दहशतवाद आता संपला हे जाहीर करावं, अस आव्हान उपरकर यांनी दिल.