भेडशी प्रशालेत एसएससी बॅच १९९१ चा स्नेह मेळावा

Edited by:
Published on: May 24, 2024 14:23 PM
views 361  views

दोडामार्ग : न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविदयालय भेडशी प्रशालेच्या एसएससी मार्च १९९१तुकडी ड च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा बुधवार दिनांक २२ मे २०२४ रोजी प्रशाळेच्या सभागृहात दिमाखात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष मुख्याध्यापक श्री.नंदकुमार नाईक हे होते. त्याचबरोबर त्या बॅचचे शिक्षक श्री.डी.जी.गोवेकर सर श्रीमती वृषाली करमळकर,श्रीमती स्मिता फातर्पेकर,श्री.एस एन देसाई सह आदी उपस्थित होते.

न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविदयालय भेडशी प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नाईक यांनी आदरणीय गुरुवर्याचे तसेच बॅचचे प्रतिनिधी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पुजन केले व द्वि'प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. यानंतर दिवंगत आदरणीय कै.साळगावकर सर कै भागवत सर कै रंगानाथ आठलेकर सर, कै.फातर्पेकर सर कै.दिवटे सर, कै.प्रभू सर, कै. करमळकर सर, कै.मणेरकर सर, तसेच ज्ञात अज्ञात सर्वांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्राचार्य नंदकुमार नाईक सर यांनी उपस्थित माजी विध्यार्थी, व्यासपीठावरील उपस्थित गुरुजन आणि आपली प्रशाला या तिहेरी भूमिकेतून आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,आपण माजी विध्यार्थी हे शाळेचे खरे आरसे आहात. त्या आरस्यातून तुमच्या मनातली भेडशी हायस्कुल ही शाळा नवनवीन प्रगती साधत राहील. याविषयीची ग्वाही दिली. शाळेमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे जे आवश्यक नवनवीन तंत्रज्ञान अपेक्षित आहे. त्यास अनुसरून आज शाळेमध्ये तीन डिजिटल क्लास रूम उपलब्ध आहेत अशी माहिती नाईक यांनी अध्यक्षीय मनोगतात दिली. सोलर डिजिटल क्लास रूम बनविण्यासाठी सेल्को कंपनीचे मॅनेजर संतोषकुमार बेळगावी यांच्या प्रयत्नातून कंपनीद्वारे आणि माजी विध्यार्थी संघ यांच्या सहकार्यातून हा उपाक्रम साध्य झाला त्यासाठी श्री.भूषण पांगम यांनीही सहकार्य केले. शिक्षक आमदार म्हात्रे साहेब यांनी दिलेला OHP आणि हेकेथॉन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले यश याविषयीचे प्रशंसउदगार श्री. नाईक सरांनी काढले. तसेच नवीन सांभामंडप उभारण्यासाठी रुपये २५ हजार रुपयांची मदत केल्याबद्दल बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.उपस्थित गुरुजनांच्या विषयी नाईक सरांनी कृतज्ज्ञला व्यक्त करून दिवंगत उपरोक्त नामनिर्देशीत सर्व सर्व शिक्षकांच्या आठवणीना उजाळा दिला. आपण स्वतःला भाग्यवान समजतो की,या शाळेत मी इयत्ता आठवी ते बारावी पर्यन्त शिकलो (१९८५-९०) त्याच शाळेत सुरुवातीला शिक्षक म्हणून सन ९ जून १९९४ सेवेत दाखल झालो. संस्थेच्या तीन ते चार शाळामध्ये शिक्षक म्हणून सेवा केली. दिनांक १ नोव्हेंबर २०२१ पासून संस्थेने बढती दिली. 

या शाळेसाठी, शाळेच्या प्रगतीसाठी जे जे काही विधायक काम करता येईल ते ते काम नक्कीच तन मन धन अर्पून केले व भविष्यात ही केले जाईल अशी उपस्थित विद्यार्थ्यांना ग्वाही दिली. हा कार्यक्रम अत्यंत सुरेख आणि सुंदर झाला याबद्दल मला प्रशाला मुख्याध्यापक म्हणून सार्थ अभिमान वाटतो. आपण सर्व माजी विद्यार्थ्यांनी तुमच्या गुरु जना बरोबरच माझ्या सहित सर्व विद्यमान गुरुजनांचाहि शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देवून सत्कार केलात ते सदैव स्मरणात राहील.शाळेच्या छप्पर दुरुस्ती विषयीचा संस्था अध्यक्षा अदरणीय कल्पनाताई तोरसकर मॅडम यांना मी दिलेला शब्द पूर्ण केला असेही अध्यक्षीय मनोगतात सरांनी आपले विचार मांडले.

यावेळी माजी विध्यार्थी अशोक गवस, कल्पना कदम, निशा दळवी, मेजर लेफ्टनंट भानुदास दळवी, दाजी खानोलकर, मंगेश नाईक, सुचिता पांगम यांनी आपापले शाळालेविषयीचे भावाविश्व उलगडले व गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी उपस्थित शिक्षक डी. जी.गोवेकर, श्रीमती स्मिता फातर्पेकर, श्रीमती वृषाली करमळकर, श्री. एस. एन. देसाई यांनी आपापले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जीवन सुंदर आहे. जीवनाकडे नेहमी सकारात्मक भावनेने पाहा. वाढत्या वया बरोबर आरोग्याची काळजी घ्या, आपला आवडता छंद जोपासा या व अशा प्रकारचे मौलिक मार्गदर्शन माजी विद्यार्थ्यांना केले. तसेच शाळेकडे नेहमी असंच विशाल दृष्टीने पाहावे. आम्हा गुरुजनांना व तुमच्या आई वडिलांना यामुळे सार्थ अभिमान वाटेल असाही मौलिक सल्ला उपस्थित माजी गुरुजनांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भानुदास दळवी यांनी करत असताना म्हणाले की,बॅचच्या वतीने कार्यक्रम नियोजना साठी प्रशाळेचे प्राचार्य नाईक सर यांनी उत्तम सहकार्य केले व केलेले आदरातिथ्य पाहून सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. ग्रुप मेंबराच्या वतीने त्यांनी नाईक सरांना धन्यवाद दिले.सूत्रसंचालन : बॅचच्या वतीने संजय दळवी तर सुरवातीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सागर पांगुळ यांनी केले. यावेळी प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. संगिता देऊलकर, सौ. मधुरा नाईक मॅडम, सौ. पूर्वा गवस मॅडम, इग्लिश मिडीयम प्राचार्य भणगे मॅडम, लिपिक श्री. अर्जुन शेटकर व सेवक मित्र श्री. विठ्ठल गावडे, राजन नाईक, महेश गावडे, श्रीम. फर्नांडिस कार्यक्रमास उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रम : यावेळी माजी विध्यार्थी उल्हास चोर्लेकर, आनंद नाईक, भानुदास दळवी, अशोक गवस, सुचिता पांगम, निशा दळवी, शालिनी नाईक, सविता गवस, दाजी खानोलकर, मंगेश नाईक यांनी यांनी संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत प्रशाळेच्या सभागृहात बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यामध्ये बालपणातील आपापल्या आवडीच्या छंदानुसार भजन, गायन, नाटक, वादन, हिंदी सिनेमा गीत, नृत्य, डान्स इत्यादी बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्याध्यापक नाईक सर हे ही उपस्थित होते.