
वैभववाडी : तालुक्यात जबरदस्तीने महावितरणने बसविलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढण्यात यावेत, अन्यथा हे मीटर जाळले जाणार असा इशारा ठाकरे शिवसेनेच्यावतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला. तालुक्यात बसविलेल्या स्मार्ट मीटर विरोधात आज ठाकरे शिवसेना आक्रमक झाली. त्यांनी या महावितरणला घेराव घातला.
यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हा प्रमुख नंदु शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके, लक्ष्मण रावराणे, रोहीत पावसकर, गुलजार काझी, जावेद पाटणकर, जितेंद्र तळेकर यासह ठाकरे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यात ग्राहकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. याच बील चारपट आलं आहे. यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. हे सर्व मीटर तात्काळ काढण्यात यावेत अन्यथा ते जाळून टाकण्यात येतील असा इशारा ठाकरे शिवसेनेने दिला आहे.