जलतरण स्पर्धेत स्मरण मंगलोरकर - डींपल गौडा ठरली विजेती

Edited by:
Published on: November 28, 2024 18:16 PM
views 402  views

सिंधुदुर्गनगरी : मालपे ते विजयदुर्ग खाडीमध्ये झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये १५ कि.मी. स्पर्धेही पार पडून या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. पुरुष गटातून बेळगांवचा स्मरण सुजीत मंगलोरकर याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर महिलांच्या गटातून बेंगलोरची डीपल गोड्डा हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मालपे ते विजयदुर्ग ऐतिहासिक बाघोटन खाडीमध्ये विजयदुर्ग येथील श्री दुर्गा माता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांनी विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या सहकार्याने व जीम-स्थिमिंग अॅकॅडमी यांच्या नियोजना खाली महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने संघटनेचे अध्यक्ष आनंद माने, सुधाकर शानबाग, सचिव राजेंद्र पालकर चांच्या मार्गदर्शनाखाली मालपे ते विजयदुर्ग खाडीमध्ये १५ व ३० कि.मी. च्या जलतरण स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये ५ ते ५९ वर्ष बद्योगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, या स्पर्धेतील ३० कि.मी. स्पर्धेचा निकाल यापूर्वी जाहीर झाला असून आता १५ कि.मी. जलतरण स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या स्पर्धेचे उद्‌द्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक केदार गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजयदुर्ग गावचे सरपंच प्रसाद देवधर, मालपे गायचे साधीक मालपेकर, तौफीक मुल्ला, विजयदुर्गचे रविक्रांत राणे, संजना आवळे, स्पर्धा निरिक्षक श्री आखाडे आणि जीम-स्थिम अॅकॅडमीचे अजय पाठक उपस्थित होते, त्यांनीच या स्पर्धेचे यशस्वीपणे नियोजन केले होते.

या स्पर्धेमध्ये १५ कि.मी. च्या जलतरण स्पर्धेत खुलागट पुरुष मधुन प्रथम स्मरण सुजीत मंगलोरकर (बेळगांव), द्वितीय क्रमांक मानव राजेश मोरे (ठाणे), तृतीय क्र आयुष प्रविण तावडे, चतुर्थ क्रमांक शिवराज नागेश पाटील (कोल्हापूर), पाचया व मांक सार्थक संदीप कोल्हापुरे (कोल्हापूर), महिला गटामधून प्रथम क्रमांक डींपल गोड्डा (बेंगलोर), द्वितीय आयुषी कैलाश आखाडे (ठाणे), तृतीय अनन्या पवन पतकी (कोल्हापूर), चतुर्थ क्रमांक स्मृती सत्चीन जांभळे (ठाणे), पाचवा क्रमांक किमया गायकवाड (ठाणे) 


या स्पर्धेचे बक्षीस समारंभ संजना आळवे, प्रदिप साटणकर, रविकांत राणे, याबू डोंगरे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निरिक्षक श्री. आखाडे उपस्थित होते. तर या स्पर्धेसाठी पंच म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते सतीश कदम, अर्जुन मगदूम रणजित शिंदे, सचिन जांभळे यांनी काम पाहीले