
कणकवली : शिष्यवृती परीक्षेत एसएम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पद्मज योगेश महाडिक याने २२४ गुण तर कार्तिक विकास साईल याने २०२ गुण मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त केली. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सुमंगल श्रीवल्लभ शिखरे याने २३२ गुण, जस्मिता संजय पावसकर हिने २०२ गुण, अथर्व संतोष राठवड याने १९२ गुण , गौरव अजित जगदाळे याने गुण १९० गुण, राजलक्ष्मी संग्राम पाटील हिने १८८ गुण मिळवून जिल्हा शहरी विभागात शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.
विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षक एस. एम. नौकुडकर, एन. एन. तायशेटे, व्ही.एस. सातपुते, एस.एस.पाटील पी.पी.पराडकर ,एस. सी. मयेकर ,शिष्यवृत्ती विभागप्रमुख एन.के. केसरकर, एस. एम. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाºया शिक्षकांचे कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे पदाधिकारी कार्याध्यक्ष डॉ.एस.सी. सावंत, सचिव डी. एम. नलावडे, उपकार्याध्यक्ष डॉ.एस.एन.तायशेटे, उपकार्याध्यक्ष एम. ए. काणेकर मुख्याध्यापक जी. एन. बोडके, उपमुख्याध्यापक आर. एल. प्रधान, जी.ए.कदम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.