
देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरगाव जिल्हा परिषद गटाने स्लो सायकल स्पर्धा लहान गट व खुला गट अशा दोन गटात घेण्यात आली. यात मोठ्या गटात 27 स्पर्धकांनी तर लहान गटात बारा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
मोठ्या गटात प्रथम क्रमांक जशीथ साटम, द्वितीय क्रमांक पवन समीर चव्हाण, तृतीय क्रमांक समर्थ मंगेश माने यांनी पटकावला तर लहान गटात प्रथम क्रमांक हार्दिक कृष्णा कदम, द्वितीय क्रमांक गंधर्व सुनील तावडे, तृतीय क्रमांक भक्ती तावडे यांनी पटकावला. विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मिलिंद साटम, सुभाष नार्वेकर, युवक तालुका अध्यक्ष अमित साटम,मंगेश लोके, केशव साळसकर, शैलेश जाधव, राजू साटम, विनायक साटम, मंगेश माने, मंगेश पवार, युधिराज राणे, सुहास राणे, ओंकार तावडे, संध्या राणे, सुनील तावडे, विठोबा घाडी, ऋषिकेश आईर, यतीन पारधी, ओंकार साटम, सुधीर साटम, अश्मित देसाई, शीतल तावडे, इत्यादी पदाधिकारी, पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान सर्वांना लाडू वाटून नामदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.