सावंतवाडी डेपोत धूळ खात उभ्या असलेल्या स्लीपर कोच एसटी बस वेंगुर्ला डेपोला द्याव्यात : संजय गावडे

Edited by: दिपेश परब
Published on: September 16, 2023 18:58 PM
views 376  views

वेंगुर्ला :  सिंधुदुर्ग एस. टी. महामंडळास स्लीपर कोच गाड्या मिळाल्या असून त्यापैकी ३ गाड्या सावंतवाडी एस. टी. डेपोत गेले तीन दिवस उभ्या आहेत. सावंतवाडी मतदार संघाचे आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी त्या गाड्यांचे उद्घाटन करण्याचा अट्टाहास धरल्याने या गाड्या उभ्या असल्याची महिती मिळत आहे. तरी हा अट्टाहास त्यांनी सोडावा.  व या गाड्या वेंगुर्ला डेपोला द्याव्यात अशी मागणी उबाठा शिवसेनेचे एसटी कामगार सेना अध्यक्ष संजय गावडे यांनी केली आहे. 

वेंगुर्ला डेपोतून आरोंदा परेल एसटी बस उबाठा शिवसेनेच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू झाली. यामुळे चाकरमान्यांना याचा मोठा फायदा होत आहे. सद्या कोकण वासीयांच्या जिव्हाळ्याचा गणेशोत्सव सुरू होणार असून या स्लीपर गाड्या कोकणी चाकरमान्यांना मिळाल्यास प्रवास आरामदायी होऊ शकेल. त्यामुळे याची योग्य दखल घेऊन एसटी महामंडळाने तात्काळ या गाड्या वेंगुर्ला डेपोला देऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर करावा. अशी मागणी वेंगुर्ला एस टी कामगार सेना अध्यक्ष संजय गावडे यांनी केली आहे.