
चिपळूण : अंगातील कला ही कलाकारांना कधीही स्वस्त बसून देत नाही. घर संसार , कितीही व्याप असलातरी कलाकार आपली कला जोपासण्यासाठी वेळ काढतोच आणि कलेचे रुपांतर व्यवसायात करणारे खूप कमी व्यक्ती आहेत त्यामध्ये रत्नागिरी मधील दोन बहिणी निकिता निलेश आंबेकर आणि श्रुती उमेश बने यांचा समावेश आहे. या दोन्ही बहिणी मिळून आकर्षक आकाश कंदील बनवतात. रत्नागिरी मध्ये घरोघरी त्यांनी बनवलेले आकाश कंदील दिवाळीत झळकणार आहेत.
लहानपणी वडीलांकडून आकाशकंदील तयार करण्याची कला आत्मसात केल्यानंतर त्या कलेचं व्यवसायात रूपांतर करणाऱ्या दोघी बहिणी नव्या उद्योजकांना आदर्श बनल्या आहेत . आज सर्व कुटुंबाला एकत्र करून आकाश कंदील व्यवसाय नावारूपाला आणला आहे त्यामुळे रत्नागिरी मधील बऱ्याच घरांमध्ये निकिता आणि श्रुती यांनी तयार केलेलें आकाश कंदील दिसणार आहेत. दिवाळीत घर सजावटीतला अनिवार्य घटक म्हणजे आकाशकंदील. वेगवेगळ्या आकाराचे, विविध रंगाचे आकाशकंदील सध्या ट्रेंडींगमध्ये आहेत. दिवाळी काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे.
रत्नागिरी मधील परिसरातल्या आंबेकर कुटुंबियांनी यंदा इको फ्रेंडली आकाशकंदील बनवायला सुरुवात केली आहे. यावर्षी पारंपारिक आकाराचा आणि मोठ्या आकाशकंदीलला या वर्षी बऱ्यापैकी मागणी आहे. हे आकाशकंदील बनवताना मोठी कसरतच असते. बांबूच्या पट्टी कापून त्याची विविध डिझाईन तयार करून ठेवणे हे महत्त्वाचे आहे त्यानंतर कागद डिझाईन मध्ये कापून घ्यावा लागतो. तसेच लेस यांच्या मदतीनं बनवले जातात. गडद रंगाचे रंगींबेरंगी तसेच चौकोनी, गोल, षटकोनी आकाराचे आकाशकंदीलही यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. ह्या दोन भगीनीं चार वर्षांपूर्वी आकाशकंदील खरेदी करण्यासाठी बाजारात गेलेल्या असता. त्यावेळी याच्या किंमती बऱ्यापैकी आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आपणही या प्रकारचे अगदी सामान्यांना परवडतील असे आकाशकंदील घरी बनवण्यास सुरूवात केली तर आपलेही कंदील ग्राहकांच्या पसंतीस उतरतील. या युक्तिने त्यांनी सुरुवात केली. या वर्षी त्यांनी विविध आकरांचे आकाशकंदील बनवले असून. ग्राहकांना विशेष थीमचे किंवा कोणत्याही डिझाईनचे हवे तेवढे आकाशकंदील त्या बनवून देतात. काही कंदील ग्राहकांच्या सोयीनुसार त्यांना परवडण्यासारखे सुध्दा आकाशकंदील इथे उपलब्ध असणार आहेत.
एक आकाशकंदील व्यवस्थित बनवायला सुमारे दीड तास लागतो. आम्ही ऑर्डर नुसार सुद्धा आकाशकंदील तयार करून देतो. ४००ते ८०० रुपयांपर्यंत आमच्याकडे आकाशकंदील उपलब्ध आहेत. असं निकिता आंबेकर यांनी सांगितले. तर, ‘४ वर्षांपासून आम्ही पारंपारिक पण त्याला वेगवेगळे टेक्सचर देऊन आकाशकंदील बनवत आहोत.’ श्रुती यांनी सांगितले की आमचें वडील विजय नारायण पवार हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरी सांभाळून वेगवेगळे कलात्मक व्यवसाय करत होते. भाऊ विशाल हा मंडप व्यवसाय मध्ये यशस्वी उद्योजक आहे
सुरुवातीला आम्ही वडीलांसोबत मिठाईचे बॉक्स , गणपतींचे मखर,पुजेची मखरे ,दिवाळीत कंदील असे सिझनप्रमाणे वेगवेगळे व्यवसाय होतें.या सर्व कला आमच्याही दोन्ही बहिणींच्या अंगी उतरल्याच आहेत. यांचा फायदा आम्हां दोघी बहिणींना झाला. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आमच्या अंगी असलेल्या कलेला आमच्या सासरच्या मंडळींनी प्रोत्साहन दिले आहे. आम्हां दोघींच्या पतीने आम्हांला नेहमी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या मध्ये आमच्या मुलांचाही हातभार आहे. आमचें कंदील माळनाका शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर संध्याकाळच्या वेळेस स्टॉल उभारण्यात येतो आणि तिथेच विक्री होते. आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुध्दा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे श्रुती आणि निकिता यांनी सांगितले.