
वैभववाडी : नापणे धनगरवाडा येथील वृद्धावर जीवघेणा हल्ला करून सोनसाखळी घेऊन पसार झालेल्या चोरट्याचे पोलीसांनी स्केच तयार केले आहे. त्या वर्णनांची व्यक्ती कुठे आढळल्यास त्वरित पोलीसांशी संपर्क साधण्याचं आव्हान करण्यात आले आहे.
नापणे येथील पुरुषोत्तम नरहरी प्रभुलकर, वय ८१ या वृद्धावर घरासमोरील अंगणात येऊन अज्ञात चोरट्यांने हल्ला करून त्यांच्या गळ्यातील दिड तोळ्याची सोनसाखळी लांबवली. या हल्यात श्री. प्रभुलकर हे गंभीर जखमी झाले. या धाडसी चोरीच्या प्रकारानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरली आहेत. या चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्या चोरट्याच स्केच तयार केले आहे. प्रभुलकर दाम्पत्यांनी वर्णन केल्यानुसार हे स्केच तयार करण्यात आले आहे. संबंधित वर्णनाची व्यक्ती कुठे आढळल्यास पोलीसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले आहे.