
सिंधुदुर्ग: अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात गुरुवार दि. २५ जून रोजी सिंधुदुर्गनगरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे 'उपवर्गीकरण रद्द करा!' या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. समाजात फूट पाडणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी, ताकद दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी केलंय.
सरकारला उपवर्गीकरणास असणारा विरोध दाखवून देण्यासाठी या आंदोलनाच आयोजन करण्यात आले आहे. यात संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्ग, जिल्हा चर्मकार उन्नती मंडळ, बौद्ध सेवा संघ वैभववाडी, देवगड बौद्ध सेवा संघ दक्षिण विभाग, भारत मुक्ती मोर्चा सिंधुदुर्ग तसेच इतर समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असणार आहे. सकाळी ११ ते ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे हे आंदोलन होणार आहे.










