मराठा बिझनेसमन फोरम तर्फे सीताराम गावडे सन्मानित

Edited by:
Published on: June 24, 2024 09:50 AM
views 195  views

सावंतवाडी :  मराठा बिझनेसमन फोरम या देशपातळीवर काम करणाऱ्या संस्थेने मराठा समाजासाठी गेली अनेक वर्षे करत असलेल्या कामाची दखल घेत सीताराम गावडे सीताराम गावडे यांना. हिर्लोक मामाचे गाव रिसाॅर्ट मध्ये आयोजित कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन  सन्मानित करण्यात आले.हा सन्मान प्रसिद्ध उद्योगपती व बिल्डर राजेंद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

मराठा बिझनेसमन फोरम ही संस्था गेली दहा वर्षे महाराष्ट्र राज्य व इतर काही राज्यात मराठा छोटे मोठे उद्योजकांसाठी काम करते,कै आप्पासाहेब पवार या फोरमचे संस्थापक होते, त्यांच्या पश्चात या मराठा बिझनेसमन फोरम ने उतुंग भरारी घेऊन अनेक मराठा छोट्या मोठ्या उद्योजकांना स्वताच्या पायावर उभे केले आहे.

या मराठा बिझनेसमन फोरम चा वार्षिक आढावा कार्यक्रम हिर्लोक येथील मामाचे गाव रिसाॅर्ट मध्ये मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला, यावेळी फोरमचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती बिल्डर राजेंद्र सावंत,सचिव अरुण पवार, अच्यूत भोसले, ब्रिगेडियर सुधीर सावंत,सौ अर्चना घारे परब,प्रा सतीश बागवे, डॉ जे टी राणे, डॉ सौ बिरमोळ, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास सावंत,मामाचे गाव रिसाॅर्ट चे मालक उद्योगपती अनंत सावंत,व फोरमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवीन सदस्यांना मराठा बिझनेसमन फोरम ची माहिती देण्यात आली,व छोट्या मोठ्या नव उद्योजकांना सन्मानित करण्यात आले.