
दोडामार्ग : 'असा कसा देवाचा देव बाई ठकडा' या गौळण गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. पण अतिशय भावपूर्ण आणि तितकीच खुमासदार गौळण सादर करून साळ - गोवा येथील शारदा शेटकर यांनी दोडामार्ग येथे आयोजित गौळण गायन सादरीकरणात प्रथम क्रमांक पटकावला. दोडामार्ग शहरातील श्री राष्ट्रोळी दत्त भजन मंडळाने खुली गौळण गायन स्पर्धा आयोजित केली होती.
यात तब्बल ३४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर या स्पर्धेत नाविन्यपूर्ण गौळण सादरीकरणाने रसिकांनी गायनाची पर्वणी अनुभवता आली. या स्पर्धचे बक्षीस वितरण प्रसंगी गोव्यातील ख्यातनाम गायक तथा स्पर्धा परीक्षक विठ्ठल शिरोडकर यांसह श्री राष्ट्रोळी दत्त भजन मंडळाचे गायक सुधीर सावंत, शाणी बोर्डेकर, बाबाजी डांगे, बबन सावंत, श्रीधर रेडकर, प्रकाश रेडकर, विष्णू खांबल, प्रभाकर बोर्डेकर, बाळकृष्ण च्यारी, सुनील च्यारी यांसह हार्मोनियम वादक आनंद नाईक, तबला वादक जानू शिरवलकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - प्रथम क्रमांक शारदा शेटकर (साळ गोवा), द्वितीय क्रमांक देव दळवी (चरवण गोवा), तृतीय क्रमांक तेजस्वी हळीद (केरी, गोवा) तर उत्तेजनार्थ ओंकार शेटगावकर, गणेश शिरोडकर, गितेश कांबळी, प्रवीण नाईक, विद्यानंद गावस यांनी क्रमांक पटकाविले.
फोटो -
दोडामार्ग : येथील श्री राष्ट्रोळी दत्त भजन मंडळ आयोजित गौळण गायन भजन स्पर्धेत विजेत्या गायकांना गौरविताना मान्यवर.