सिंधुरत्न जाॅब फेअर 2024चे नारायण राणेंना आमंत्रण !

Edited by: भरत केसरकर
Published on: January 03, 2024 16:13 PM
views 978  views

सिंधुदुर्ग : 12 जानेवारी रोजी सावंतवाडी जिमखाना मैदानावर येथे होणाऱ्या भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजित "सिंधुरत्न जाॅब फेअर 2024"चे आमंत्रण आज नारायण राणे यांना आयोजकांच्या वतीने देण्यात आले. भारतीय युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष विशाल परब आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश मोर्ये यांनी नारायण राणे यांना कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमंत्रित करत आमंत्रण दिले आहे. कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर राणे यांची भेट घेत या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे.

       सिंधुरत्न  जॉब फेअर 2024अत्यंत स्तुत्य उपक्रम असून तरुणांना रोजगार मिळत असेल तर आपल्याला अतिशय आनंदच आहे. अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. "विशाल" यांने हा कार्यक्रम आयोजित करताना हा फार मेहनत घेतली आहे."विशाल"च व्यक्तिमत्व विशालआहे,त्यामुळे त्याचा हा कार्यक्रम भरगच्च आणि "विशाल"च असणार आहे.अशी प्रतिक्रिया देत या कार्यक्रमाला नारायण राणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची माझी फार इच्छा असल्याचे नारायण राणे यांनी यावेळी मीडियाशी बोलताना स्पष्ट केल.ओम गणेश बंगल्यावर कणकवली येथे नारायण राणे बोलत होते.यावेळी विशाल परब,प्रकाश मोर्ये,प्रितेश राऊळ,भूषण आंगचेकर आदी उपस्थित होते.