अभिमानास्पद ! सिंधुदुर्गची पहिली 'अग्नीवीर' रेणुका राणेची भारतीय सैन्यात निवड

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 05, 2023 12:31 PM
views 1322  views

देवगड : हिंदळे गावची सुकन्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची पहिली "अग्नीवीर " कु. रेणुका विलास राणे हिचे बेंगलोर येथील प्रशिक्षण यशस्विरीत्या पूर्ण झाले आहे. तिची भारतीय सैन्यात निवड झाली आहे. त्यांची आसाम येथे नियुक्ती झालेली आहे. ही रेणुका राणे हीची झालेली निवड हिंदळे गावाच्यादृष्टीने अत्यंत अभिमानास्पद्ध आहे.

तिच्या या प्रचंड यशाचे गमक तिची अपार मेहनत, ग्रामदैवत श्री काळभैरव यांचे आशिर्वाद आणि तिच्या आई - वडिलांचे पाठबळ हेच आहे. रेणुका हिचे देवगड मधून तसेच सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. रेणुका हिचेअभिनंदन आणि कौतुक करावे तितके थोडेच आहे.

तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी श्री काळभैरवाने अशीच कृपादृष्टी ठेवो आणि तिची उत्तरोत्तर प्रगती होत राहो, अशी हिंदळेवासियांकडून तिच्या या यशासाठी देवाकडे प्रार्थना करण्यात आली. रेणुका हिला तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा ही हिंदळेवासियांकडून यावेळी देण्यात आल्या.