वाचनसंस्कृतीला बळ देण्यासाठी कोकण संस्थेचा पुढाकार

Edited by:
Published on: March 31, 2026 17:50 PM
views 19  views

सिंधुदुर्ग :  कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधदुर्ग यांच्या पुढाकारातून वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी सक्षम बुक बँक हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत देशभरातील एकूण १२ वाचनालयांना सुमारे १००० हून अधिक पुस्तके भेट देण्यात येत आहेत. यामध्ये खानोलकर वाचन मंदिर,मळगाव वाचनालय, कळसुलकर इंग्लिश स्कुल वाचनालय, श्री पंचम खेमराज कॉलेज वाचनालय (सावंतवाडी), तुळस वाचनालय (वेंगुर्ले) यांसह विविध वाचनालयांचा समावेश आहे. भालावल येथे सुरू करण्यात आलेल्या वाचनालयासही संस्थेच्या वतीने पुस्तके देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन विचारांची समृद्धी आणि सुसंस्कार जोपासण्यास मोठी मदत होणार आहे.

आज भालावल येथे झालेल्या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे, सरपंच समीर परब, उपसरपंच अर्जुन परब, प्रवीण पंडित, गुरुदास गवंडे, ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती राणे, सदस्य अमित गुळेकर, सुमित्रा परब, रुक्षाली परब तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत पेरूच्या कलमाने करण्यात आले. संस्थेच्या प्रतिनिधींनी उपक्रमाची माहिती देत ग्रामीण भागात वाचनसंस्कृती बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला. सरपंच समीर परब यांनी संस्थेचे आभार मानले. या उपक्रमातून ज्ञानवाटपाची चळवळ अधिक बळकट होऊन समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न अधोरेखित झाला.