नितेश राणेंच्या प्रयत्नातून देवगड जामसंडे नगरपंचायतीस सक्शन व्हॅन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 31, 2026 18:29 PM
views 46  views

देवगड : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत तीन हजार लीटर क्षमतेची सक्शन व्हॅन व जेटिंग मशीन देवगड जामसंडे नगरपंचायतीस प्राप्त झाली असून, याचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी  यांच्याकडून मिळाली आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नगरपंचायतीमधील घनकचरा व्यवस्थापन रस्ते स्वच्छता आणि कचरा मुक्त शहर बनविण्यासाठी सक्शन व्हॅन व जेटिंग मशीन आधुनिक यंत्रसामुग्री युक्त शिक्षण व्हॅन नगरपंचायतीला प्राप्त झाली असून सक्शन व्हॅन व जेटिंग द्वारे गटारातील सांडपाणी व घाण प्रभावीपणे उपस्थ येणार असून जेटिंग मशीन साह्याने बंद असलेली पाईपलाईनची सफाई अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. तसेच टॉयलेटच्या टाक्या उपसणे या कामाला आता गती मिळणार असल्याचे देखील तारी यांनी यावेळी बोलताना सांगितले.